Posts

मित्रहो

  सहजच विचार करत बसलो होतो आणि काही लोक, काही प्रसंग कसे आपल्या जडण घडणीत महत्वाचे ठरतात हे पुन्हा एकदा जाणवल. सध्या थँक्सगिविंग आठवडा साजरा होतो आहे. तर वाटलं की अगदी फॉर्मल थॅंक यू नाही तरी त्या अनुभवांची उजळणी करायला हरकत नाही. खरं तर या पशिमी पद्धती मुळे नाही पण माझ्या लवकरच येणाऱ्या बेचाळीसाव्या वाढदिवासमुळे मी आजकाल जरा अंतर्मुख झालो आहे. खूप लांबचा पल्ला गाठला आहे असं काहीसं वाटत होतं (म्हणजे खूप काही दिवे लावलेले नाहीत आणि अजूनही खूप काही करायची इच्छा/खुमखुमी आहे ... 😊 ). पण मागे वळून पाहतांना काही ठळक टप्पे सहज लक्षात येतात. त्यातला एक म्हणजे batu. मी पुण्यात आलो आणि लक्षात आलं की स्पर्धेत आपण कुठेच नाही. माझ्यासारख्या छोट्या शहरातल्यासाठी पुणे आणि इथली चढाओढ दोन्हीही खूप नवीन आणि दडपवून टाकणारी होती. आपला निभाव लागणार नाही हे पण कळत होतं. त्यात माझा पहिला जॉब icici बँकेतला होता आणि त्या सगळ्या एटीएम समोर ताटकळत आणि लोकांची हेटाळणी झेलत काढलेल्या दुपारी सुद्धा फरश्या उत्साहवर्धक नव्हत्याच. आणि मग batu नामक दुनियेत प्रवेश झाला. प्रवेशाचा सुद्धा एक वेगळाच किस्सा आहे

लग्न!!

सहा वर्ष होत आलीत लग्नाला. लग्नाच्या वेळेची धाकधूक, भविष्या बद्दल संभ्रम, अनिश्चितता अजूनही आठवते. मला नेहमीच वाटतं की लग्न म्हणजे permanent marker ने पेपर सोडवण्यासारख आहे. एकदा का एखाद्या उत्तरावर टिक केलं की नंतर ते उत्तर खोडून दुसरं लिहिता येत नाही. लग्नाच्या आधी दुसऱ्यांचे लग्नाचे अनुभव ऐकून, पाहून जरा भीती पण वाटायची. त्यात आम्हाला कोण्या पोरीने कधीच भाव न दिल्यामुळे आई वडीलांना तेही एक काम आमच्यासाठी करावं लागणार होते. पोरी पाहणे (आणि स्वतःला दाखवून घेणे) ह्याचं सुद्धा टेन्शन होतंच. पण मी भारतात परत आल्यानंतर दोन दिवसांत मी एंगेज होतो काय आणि पुढे ते सत्य स्वतःला पटवे पर्यंत एका महिन्यात लग्न होऊन बायको नामक गोष्ट घरी येते काय ..... सगळच स्वप्नवत. बायको. लग्नाच्या आधी मुलींविषयी असणारे समज (खरं तर गैर)  हळूहळू दूर होवू लागले. स्त्रियांविषयी मला नेहमीच आदर होता. पण एखादी स्त्री फक्त आपलं त्या माणसाशी लग्न झालय म्हणून त्याला आपलं सर्वस्व कस काय मानू शकते आणि त्याच्यासोबत आयुष्यभर राहण्याच्या आणाभाका कशा घेवू शकते हे मला कोडं होतं. खरं तर दोन अनोळखी, वेगळे आणि जीवनाबद्दल स्वतंत्

वैचारीक गुंता ...

इथे काहीही लिहावं म्हटलं कि जमतच नाही आजकाल. एका विचाराचं बोट धरून शेवट गाठावा असं होतच नाही. खूप सारे वेगवेगळे विचार एकाच वेळी डोक्यात चालू असतात. एकमेकांना पुर्णत्वापासून अडवत असतात. खिचडी होते पार डोक्यात. माझा तर पार विचारी बाबा झाला आहे. कधी कधी तर विचार कसे थांबवता येतील याचा देखील मी विचार करतो .... तोही अर्धवट... एखादी गोष्ट जाणवते असं म्हणतांना ती मनात नक्की कशी उमटली आहे हे समजायला हवं. विचार मनात घोळवत ठेवून त्यात रमायला हवं तर मग त्याचा आपला आपल्याला बोध होतो. पण हे जमत नाही आजकाल. सात रंगाचं इंद्रधनुष्य होतं म्हणतांना ते सात रंग एकत्र होऊन चालत नहित. विचारांचं पण तसच असतं. पुन्हा एकदा प्रयत्न करावा म्हणतोय … बघू जमतंय का …

गणित

मला गणितात कधीच गती नव्हती. पण कधी कधी वाटतं कि सगळीकडेच तर गणित असतं. आयुष्याचं सुद्धा गणित जुळून यावं लागतं.  कुणाचं ते लवकर जुळून येतं तर कुणाचं फार उशिरा. आणि त्या गणिताच्या उत्तरावरून तुमच्या आयुष्याचं वर्गीकरण होतं. खरं तर वर्ग पण आधीच ठरलेले आहेत. यशस्वी, संपन्न, परिपूर्ण, साधारण, किंवा वाया गेलेलं. फक्त हव्या असलेल्या वर्गात जाता यावं म्हणून आपण आयुष्य ट्यून करत असतो. यशस्वी होण्याचा फोर्मुला शोधत असतो. किवा असं म्हणूयात की आयुष्याला ट्रेन करत असतो. मग प्रत्येक नोड चे वेट्स adjust करत आपल्याला हवं असलेलं उत्तर मिळायला लागलं कि मग आपण so called यशस्वी आयुष्य जगायला लागतो. पण ते मिळवायला, आयुष्य ट्यून करतांना आपण गमावतो ते कदाचित जास्त महत्वाच, जास्त सुंदर आणि माणूस म्हणून आपलं वेगळेपण जपणारं काही तरी असेल हे आपल्याला कधी जाणवतच नाही.  हे वर्गीकरण कुणी केलं? का केलं? आणि मुळात मला हे स्वतःसाठी हवं आहे का याचा विचार न करता आपण धावत सुटतो बाकी लोकांसोबत. त्यांच्यासारखच बनण्यासाठी. मग छाप मारल्यासारखे उमटत राहतात सगळे. सगळेच सारखे. इंग्रजी पिक्चर मध्ये कल्पना रंगवतात माणसांच्या मशीन

Mountain Music

I Loved This. Amazing Music. The person is so passionate about music. This is the first time I heard David Holt and I think I missed a lot of good music.

Atheist!

I stopped believing in god one day. That was not because I read some theory against the theory for existance of god. I dont belive in god because I feel it doesnt exist. Why do I need any theory for this? Or why do I need to define my atheism? Going through different opinions, I found that each one have a different view for his atheism. And that, I feel is obvious. After a child is born, we dont ask him whether he wants to believe in any god or not. They are taught to believe existance of god as a universal truth or the only truth. This may not be true for the children with atheist parents, but that is rare. So being a beliver or theist is not actually a decision by us but that is what we are borned as. Therefore when a person, on some fine day decides to turn atheist, he must have given substantial amount of time to reach to the conclusion of non existence of god. The realization or analysis from which he reached to the conclusion must have come from his personal experienc

ठेका

कधीचं हे नाटक चालू आहे ..... आमचा धर्मं मोठा , महान ..... तुमचा धर्मं सगल्या प्रोब्लेम्स च कारन ..... आमची भाषा महान , थोर ...... तुम्ही साले तिला संपवायचा कट करता आहात ..... मराठी , बिन मराठी ..... मुंबई कुणाची ? याची का त्याची ?, कुणी कस वागाव ? कस वागू नये ? तुम्ही जे वागता , करता ते आम्हाला आवडत नाही , बदला नाही तर मरा .... हे बदलल तर ते ठीक होइल , ते बदलल तर हे ठीक होइल ...... चर्च तोडा , मन्दिर फोड़ा , मशीद पाडा , .... तुमच्या जगण्याच उद्दिष्ट हेच आहे की तुम्ही लढला पाहिजे .... अस केलत तर ठीक नाही तर याद राखा ... जगु देणार नही .... शट अप यू रस्काल्स .... अरे तुम्ही लोक जगु तरी कुठे देता आहात ..... आमचा तर मरनच आहे ... साल ज्यांनी बाप जन्मात कधी काम नाही केलेल ... फुकटचं खाऊन जगले साले , ते लोक आम्हाला शिकवतात कसा जगायचा ते .... आमच्या घामाच्या पैशांची नासाडी करून .... आमच्यावरच दादागीरी करून .... समजकार्याचा आव आणतात ... जणू काही भारतापुढचे सगळे प्रोबेल