मित्रहो
सहजच विचार करत बसलो होतो आणि काही लोक, काही प्रसंग कसे आपल्या जडण घडणीत महत्वाचे ठरतात हे पुन्हा एकदा जाणवल. सध्या थँक्सगिविंग आठवडा साजरा होतो आहे. तर वाटलं की अगदी फॉर्मल थॅंक यू नाही तरी त्या अनुभवांची उजळणी करायला हरकत नाही. खरं तर या पशिमी पद्धती मुळे नाही पण माझ्या लवकरच येणाऱ्या बेचाळीसाव्या वाढदिवासमुळे मी आजकाल जरा अंतर्मुख झालो आहे. खूप लांबचा पल्ला गाठला आहे असं काहीसं वाटत होतं (म्हणजे खूप काही दिवे लावलेले नाहीत आणि अजूनही खूप काही करायची इच्छा/खुमखुमी आहे ... 😊 ). पण मागे वळून पाहतांना काही ठळक टप्पे सहज लक्षात येतात. त्यातला एक म्हणजे batu. मी पुण्यात आलो आणि लक्षात आलं की स्पर्धेत आपण कुठेच नाही. माझ्यासारख्या छोट्या शहरातल्यासाठी पुणे आणि इथली चढाओढ दोन्हीही खूप नवीन आणि दडपवून टाकणारी होती. आपला निभाव लागणार नाही हे पण कळत होतं. त्यात माझा पहिला जॉब icici बँकेतला होता आणि त्या सगळ्या एटीएम समोर ताटकळत आणि लोकांची हेटाळणी झेलत काढलेल्या दुपारी सुद्धा फरश्या उत्साहवर्धक नव्हत्याच. आणि मग batu नामक दुनियेत प्रवेश झाला. प्रवेशाचा सुद्धा एक वेगळाच किस्सा आहे