गणित

मला गणितात कधीच गती नव्हती. पण कधी कधी वाटतं कि सगळीकडेच तर गणित असतं. आयुष्याचं सुद्धा गणित जुळून यावं लागतं.  कुणाचं ते लवकर जुळून येतं तर कुणाचं फार उशिरा. आणि त्या गणिताच्या उत्तरावरून तुमच्या आयुष्याचं वर्गीकरण होतं. खरं तर वर्ग पण आधीच ठरलेले आहेत. यशस्वी, संपन्न, परिपूर्ण, साधारण, किंवा वाया गेलेलं. फक्त हव्या असलेल्या वर्गात जाता यावं म्हणून आपण आयुष्य ट्यून करत असतो. यशस्वी होण्याचा फोर्मुला शोधत असतो. किवा असं म्हणूयात की आयुष्याला ट्रेन करत असतो. मग प्रत्येक नोड चे वेट्स adjust करत आपल्याला हवं असलेलं उत्तर मिळायला लागलं कि मग आपण so called यशस्वी आयुष्य जगायला लागतो. पण ते मिळवायला, आयुष्य ट्यून करतांना आपण गमावतो ते कदाचित जास्त महत्वाच, जास्त सुंदर आणि माणूस म्हणून आपलं वेगळेपण जपणारं काही तरी असेल हे आपल्याला कधी जाणवतच नाही.  हे वर्गीकरण कुणी केलं? का केलं? आणि मुळात मला हे स्वतःसाठी हवं आहे का याचा विचार न करता आपण धावत सुटतो बाकी लोकांसोबत. त्यांच्यासारखच बनण्यासाठी. मग छाप मारल्यासारखे उमटत राहतात सगळे. सगळेच सारखे.
इंग्रजी पिक्चर मध्ये कल्पना रंगवतात माणसांच्या मशीनी झाल्याच्या. सुरुवात झाली बहुतेक खरच.

Comments

Popular posts from this blog

मित्रहो

आपुलकी

लग्न!!