वैचारीक गुंता ...

इथे काहीही लिहावं म्हटलं कि जमतच नाही आजकाल. एका विचाराचं बोट धरून शेवट गाठावा असं होतच नाही. खूप सारे वेगवेगळे विचार एकाच वेळी डोक्यात चालू असतात. एकमेकांना पुर्णत्वापासून अडवत असतात. खिचडी होते पार डोक्यात. माझा तर पार विचारी बाबा झाला आहे. कधी कधी तर विचार कसे थांबवता येतील याचा देखील मी विचार करतो .... तोही अर्धवट...
एखादी गोष्ट जाणवते असं म्हणतांना ती मनात नक्की कशी उमटली आहे हे समजायला हवं. विचार मनात घोळवत ठेवून त्यात रमायला हवं तर मग त्याचा आपला आपल्याला बोध होतो. पण हे जमत नाही आजकाल. सात रंगाचं इंद्रधनुष्य होतं म्हणतांना ते सात रंग एकत्र होऊन चालत नहित. विचारांचं पण तसच असतं.
पुन्हा एकदा प्रयत्न करावा म्हणतोय … बघू जमतंय का …

Comments

Popular posts from this blog

मित्रहो

आपुलकी

लग्न!!