रक्त

M.Tech. चा paper होता ... आणी मी पुण्याला होतो काही महत्वाच्या कामाकरता .. काम संपवून दूपारी लोणेरे साठी नीघालो पण प्रचंड पाउस होता आणी ताम्हीनी घाटात दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद केला होता. जायचं तर होतच काहीही करुन ... म्हणून मी भोर घाटातुन जायचं ठरवलं ... पण तीथेही आमच्या नशीबाने आणि ST महामंडळाच्या गाडीने दगा दीला. शेवटी गाडीचे सर्व लाड पुरवुन झाल्यावर आम्ही निघालो आणि रात्री महाड ला पोहचलो. आता दुसऱ्या बस ने लोनेरे जाने क्रमपात्र होते पण रात्री १० ला शेवटची गाडी असते महाड station हून आणी त्यावेली ११ वाजले होते म्हणून रस्त्यावर येवुन उभा राहीलो.

माझ्यासारखीच काही लोक आधीपासुनच उभी होती तीथे . त्यात एक माणुस कचरा टाकायाचा डबा असतो तो घेऊन उभा होता .. अगदी कवटाळून. मी मनात म्हटलं ... च्यायला..  येडपटच आहे ...एव्ह्ड काय आहे त्यात?  ... आणी मी माझ्या विचारात तल्लीन झालो. दुसऱ्यादिवाशी पेपर होता त्यामुळे टेंशन पण होतंच. बराच वेळ गेला पण कोणीच थांबत नव्ह्तं. आणी जसा जसा वेळ जात होता, त्या माणसाची अस्वस्थता वाढत होती ... तो प्रत्येक वेळी तो कचऱ्याचा डबा उघडून बघायचा आणी घाइघाइत बंद करायचा ... माझी उत्सुक्ता वाढली .... मला वाटलं काही तरी खूप मौल्यवान गोष्ट आहे त्यात ... दागीणे वगैरे असतील कदाचीत .. पण थोड्यावेळाने तो चक्क रडायला लागला .. आता खुपच अस्वस्थ झाला होता ... तो प्रत्येक गाडी मागे वेड्यासारखा धावायचा आणि तो ड़बा अधीकाधीक जवळ धरायचा आणी मधेच रडायचा .... नंतर तो अक्षरशः गयावया करत होता पण कुणीच त्याला गाडीत घ्यायला तयार नव्ह्तं .... मला मात्र त्या डब्याच कोडं सुटत नव्ह्तं ... मी सगळ्या संभावना तपासुन पहिल्या ... पण मला कळत नव्ह्त की एव्ह्ड काय महत्वाच आहे त्यात ..आणखी एक तास गेला ... आता मात्र तो सुन्न झाला होता ... त्याचे रडने थाम्बले होते ... तो जणू काही बधीर झाला होता आणि उभा होता एकाच जागी ... आणी अचानक एक sumo येवुन थाम्बली ... लोकांनी त्या माणसाला जायला सांगितलं.  ... तो जीवाच्या आकांताने गाडी कडे धावला ... जाताना त्याने अक्षरशः लोकांचे पाय धरले ... मला काहीच कळत नव्हतं ... शेवटी तो गेल्यावर मी एकाला वीचारलं .... काय होतं त्या डब्यात ?? त्याने मला जे सांगीतल त्याने माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटला.

त्यात रक्ताची बॉटल होती ... बर्फात ठेवलेली ... त्याच्या मुलाचा सकाळी माणगाव ला accident झाला होता ... आणी तीथे रक्त न मिळाल्यामुळे तो महाड ला आला होता. पण पावसामुळे वापस जाता नाही आलं दीवासभर त्याला ... आणी त्याचा मुलगा वीनरक्ताचा मरणार होता ...
आता मला कळत होत त्यात काय मौल्यवान गोष्ट होती ते .... जगातली सगाल्यत मौल्यवान गोष्ट .... आता माझं डोकं सुन्न झालं ... मला काहीच समजेना ... आणी सम्पूर्ण रात्र मला त्याचाच चेहरा दीसत होता ... त्या बापाला काय वाटत असणार ... जो आपल्या मुलाला वाचवू पण शकत नाही?...
त्या नंतर कित्येक दिवस ती रात्र आणि तो माणूस माला आठावायाचा. होप ... त्याचा मुलगा वाचला त्या दिवशी. आयुष्य खरच खुप वेगळे रंग दाखवत कधी कधी.


Comments

  1. Hi sourabh.....

    This post is very touching..... simply speechless.....
    It shows love & anxiety of a father. I hope he will fine. you wrote it very well...well done....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मित्रहो

आपुलकी

लग्न!!