मन मानत का नाही? .....

काय झाल आहे मला? प्रेमात बीमात पडलो का काय? आज काल कामात लक्ष लागत नाही, दीवसभर काही तरी वीचार करत असतो, असम्बध बोलतो, mails ची वाट पाहतो, दर दोन मिनटान्नी मेल बॉक्स उघडून send/receive करतो, या आशेने की तीची एखादी mail आली असेल ... काय चाललं काय आहे ... आधी तर मी कधीच असा नव्हतो .... फ़क्त काम कारन हेच जानत होतो मी ... पण अजकाल दीवस रात्र फ़क्त तीचेच वीचार चालू असतात, ह्रदय धडधडत असतं कायम, जोरात .... वाटतं तीची मेल यावी, फ़ोन वर बोलावे .... आणी सांगून टाकावे तीला ... की प्रेमात पडलोय तुझ्या ....
पण आम्ही जन्माचे फट्टू .... धड़ बोलायला जमलं नाही आजपर्यंत, प्रेमाचा इजहार काय खाक करणार तीच्यासमोर? आणी तीला राग आला आणी बोलनही बंद केलं तर.....? .... मग बोम्बला .... कशाला नस्ती उठाठेव? नको ....
पण मग हे कीती दीवस चालणार? कीती दीवस नुसताच झुरत राहणार? काय करू ....? पण तीच्या मनाचा काही थांग लागत नाही ... तीला काय वाटतं मझ्यावीशयी काही कळत नाही .... तीचा रागही येतो, कळत कसं नाही हीला? प्रेमात पडलोय म्हणुन? ..... येडपटच आहे ... च्यायला .....
हे मन पण ना नसते उपद्व्याप करत असतं. कशाला कोणावर जडावे याने? ... याला काही काम नसतं हो, पण आम्ही? आम्हाला तर कामं असतात? की आता मनाचे उपद्व्याप सांभाळत बसावे? चांगलं INT, CHAR, FLOAT शी मैत्री करावी, त्यांच्यावरच प्रेम करावे (अहो आमचे अन्नदाते आहेत ते), तर याचं आपलं भलतच, ....बरं एकत तर कुणाच्या बापाचं नाही. एक धागा पकडला की चालू, ... बस त्याच्याच मागे फीरत असतं, ... आणी मग आम्ही मनाच्या मागे. मग मन म्हणेल ती कल्पना रंगवत रहयाचं. स्वप्नं बघयाची तीच्या सोबतीची आणी आमच्या सहवासाची. मनातल्या मनात तर कितिदा तीला सांगून झाले आहे, बस ती समोर आली की आमची बोबडी वळते.....

आप आगये हो तो आता नाही है याद,
वरना आपसे हमे कुछ कहना जरुर था!

मनाला जागेवर आणायचा खुप प्रयत्नं केला, programs वाचायला दीले, manager चा धाक दाखवला.... डेडलाइन जवळ आली आहे याची आठवन करून दीली, पण याचे आपले भलतेच... पुन्हा पुन्हा तीच्याच वीचारात अडकतो ...आताही एव्हडं काम असताना हे लीहीत बसलो आहे ...

Comments

Popular posts from this blog

मित्रहो

आपुलकी

लग्न!!