धर्मं ......

मध्यन्तारी Discovery वर /११ चा episode दाखवलावीमाने hijack करूनथंड माथ्याने सगळा कट पुर्नत्वास नेला गेला. कुठलीही दया माया  दाखवता लोकांचे प्राण घेतले गेले आणि हे सर्व कातर कुणी तरी या कार्याला देवाचं कार्य असं सांगितलं म्हणून.

मानव जातीला पुढे नेण्यात काहीही फायदा होणार नाही अशा या उद्देशात भाग घेणार्यांना शहीद म्हणायचं आणी नीर्दोष आणी नीशस्त्रं लोकांचे प्राण घेण्याच्या कार्याला जेहाद म्हणायचं...  चांगलं आहे.

पण हे सर्व का घडतं हा खरा महत्वाचा प्रश्न आहेलोक का म्हणुन दुसर्यांच्या जीवावर उठातातका म्हणुन स्वताहालास्वतःच्या धर्माला श्रेष्ठ माणून दुसर्यांच्या धर्माला शूद्र लेखतात ह्याचा  विचार व्हायला हवा. नाहीतर हे असच चालू राहीलमनुष्य प्रजातीचा अंत होईस्तोवर. 

फार पुर्वी धर्मं कीवा कुठलेच बंधन वा नियम अस्तित्वात नसावेतलोक समूहात रहायची पण कुठल्याही गोष्टीची वाटणी झालेली नव्हती. काहीच कुणाच्या असं मालकीचं नव्हतं. खर तर त्या जाणिवाच अस्तीत्वात नसाव्यामग हळु हळु लोकांना गोष्टींवर स्वतःची मालकी असावी असं वाटू लागलं.  बलवानांना त्यांची मर्जी चालावी, शब्द चालावा अशी इच्छा झालीभांडणं वाढलीअसंतोष वाढलामग हळुहळु नीयम आलेबंधनं आलीकामाची आणि वस्तुंची वाटणी झाली. आणि समुहाचे गट पडलेत्या गटांना बांधून ठेवायला काही सुध्न्य लोकांनी त्या त्या गटांचे आणि तसेच समुहाचे असे काही कर्तव्य नेमून दीले आणि जसे ते समूह मोठे होत गेले, प्रत्येकाने नियमावली, रिती पळाव्या म्हणुन त्याला कुठल्या तरी आदीशक्तीच्या इच्छेचं नाव दीलंआणि मग तो धर्म झालासमुहा समुहांचे नियम वेगळे त्यामुळे धर्म वेगळे झाले

पण शक्तिमान आणखी शक्तिमान होत गेले. लोकांनी आपण होऊन दिलेलं पुढरीपण हे हक्काच वाटायला लागलं. आपणच काय ते लोकांचे कैवारी हा भ्रम आणि समज निर्माण झाला. आणि इथेही ह्या लोकांना धर्म कामी आला. मग पुढे जाऊन लोकांनी धर्मांचीच भाषा बदलली. इथे पृथ्वी तळावर राहून त्यांना आकाशतल्या देवाच्या जास्त जवळ जाण्याचे मार्ग कळले आणि स्वर्ग, नरक यांचे नियम लक्षात आले. धर्म लोकांना घाबरवून कह्यात ठेवण्याचा मार्ग झाला. आणि धर्मप्रसार एक महत्वाचं हत्यार बनलं. आणि मग सुरु झाला संघर्ष धर्मांचा. खरं तर माणसांच्याच हव्यासाचा. आणि त्यात मराली जाऊ लागली तीही माणसेच.

हा नरसंहार आजतागायत सुरू आहे. भाषा बदलली, मार्ग बदलले. कधी उघडपणे तर कधी आडमार्गाने हा नरसंहार आजही घडवून आणला जातो आहे. कारण हा धर्म भेद आणि ही तेढ जीवंत ठेवणे काही संस्था, काही लोक यांच्या अस्तित्वासाठी खूप महत्वाची आहे. 

आपण थांबवू नाही शकणार हे सर्वमला मान्य आहे कि नियम कायदे किवा धर्म हा हवाच...... मार्ग दाखवायलापण एकदा पुन्हा आपापल्या धर्मांची चाचपणी करावी सगळ्यांनी. मला कधी कधी हे आपल्या घरांसारख वाटतंप्रत्येक घराला कही नियम असतात आणि आपण आपापल्या घराचे नियम पाळतोघर आपल्याला उबमाया सर्व काही देतं आणि आपल्या सर्वांना ते प्रिय असतं.
पण आपल्या गरजा बदलल्याआवडी बदलल्या कि आपण एक तर ते घर बदलतो किवा गरजे प्रमाणे बदल करतो घरातआपण घर पाडून नविन जास्त चांगलंजास्त मजबूतजास्त आरामदायक आणि आपल्या भविष्याच्या गरजा पूर्ण करणारं घर बांधतो
मग आपल्या धर्मांच आपण असं नाही करू शकतजीर्णोद्धार ....... काय फक्त जीर्ण मंदिरंचाच करायचा असतोत्यात राहणाऱ्या देवांचा, खरं तर त्यात राहणाऱ्या आपल्या श्रद्धांचाजाणिवांचा आणि दीर्घ काळापासून जतन केलेल्या बुरसट विचारांचा पण व्हायला हवा......... तरच त्या जीर्णोद्धार ला काही अर्थ आहे .......


Comments

Popular posts from this blog

मित्रहो

आपुलकी

लग्न!!