आपुलकी

गेल्या कित्येक दिवसान्त इथे काहि लिहिलच नाहि. मनात विचार येणं, प्रश्‍न उठन बंद झालं असं नाहि पण खर तर मी माझ्यातच नव्हतो. गेल्या २ वर्श्नांपासुन मी वेगवेगळ्या ठिकाणी फ़िरतोय, अधे मधे घरी जाणं होतं, मित्रांशी भेटी गाठी होतात, गप्पा होतात, सगळं कसं नेहमि सारखं. पण कधि कधि वाटतं हे सर्व सरावाने तर नाही करत ना आपण? आपल्याला सराव झाला आहे या नात्यांचा, या आपुलकि, या जिव्हाळ्याचा. खरोखर असलं काहि असतं का? म्हणजे कुठलिहि गोष्ट या जगात बिना मतलबाने केलि जाते का?
मनात प्रश्नं येतात, हे जे करतोय ते का करायचं? आपण जे सगळ्यांना आपलं म्हणतो, माझं, माझे, आपले लोक म्हणत जिव्हाळा लावतो, ते का? हे आपण ठरवुन तर नाहि करत नं? मी आज जो कोणी आहे, तो मी तसा नसतो, पैसे नसतो कमावत, घर, गाडी, किंवा तत्सम गोष्टी नसत्या माझ्याकडे, तर काय हा जिव्हाळा, प्रेम कायम असतं माझ्यावीशयी? हि सर्व लोक अशिच वागली असती माझ्यासोबत? का त्या ऐवजी किव, सहानभुती असती?

Comments

Popular posts from this blog

मित्रहो

लग्न!!